About Us

श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी

गोवळकोट-पेठमाप-नजरेकाशी-चिपळूण या भागाचे जागृत देवस्थान व पटवर्धन, गोळे, दीक्षित आदि घराण्याची कुलदेवता व शेरणे काढण्याची महती असलेली, तीनही गावांचे एकजुटीचे प्रतीक असलेली भव्य जत्रा, व गुलाल मुक्त शिमगा, यामुळे अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले आणि प्राचीन इतिहास असलेले श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी चे हे देवस्थान !

श्री करंजेश्वरी देवीचे रूप अत्यंत लावण्यपूर्ण, देखणे आणि तेजस्वी आहे. देवीच्या नेत्रात हजारो मातांचे वात्सल्य भाव ओसंडून वाहताना दिसते. देवीची मूर्ती चतुर्भुज आहे. भक्तांचे रक्षण करण्यासाठी एका हातात खड्ग, एका हातात ढाल, एका हातात कुंकवाचा करंडा आणि एक हात सदैव आशीर्वादाचा आहे. अंगावर सुवर्णभूषणे आहेत. कधी देवी नऊवारी साडीत तर कधी कुमारिकेच्या रूपात दृष्टांत देते. करंजेश्वरी देवी साक्षात आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. ती करंजीच्या झाडात प्रगट झाली म्हणून तिच्या भक्तांनी करंजीचे तेल वापरू नये, असा संकेत आहे. श्री. पटवर्धन, श्री. गोळे, श्री. दीक्षित, श्री. फणसे, श्री. पुराणिक आदि मान्यवर घराण्यांची ती कुलदेवता आहे. उच्च कोटीतील समजला जाणारा नवचंडी याग तिच्या चरणी समर्पित करून कुळभक्त देवीच्या दर्शनाने कृतार्थ होतात. देश परदेशात देवीचे अगणित भक्तगण आहेत. श्री करंजेश्वरी देवी शाकाहारी आहे त्यामुळे देवस्थानाच्या आवारात धान्य वाळत घातले असता देवळाच्या अंगणात कोणताही पक्षी अथवा कोंबडा/ कोंबडी फिरताना दिसणार नाही, असा देवीचा महिमा आहे. देवीचे निशाण – ढोलकाठी म्हणजे देवीचा राखणदार आहे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिले असता, मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूस त्यांचे स्थान आहे.

श्री देव सोमेश्वर व आदि शक्ती श्री देवी करंजेश्वरी माता

भक्तांच्या सहकार्यानेच मंदिरातील पूजा-अर्चा, धार्मिक उपक्रम व सेवा कार्य सातत्याने सुरू राहतात. आपले प्रत्येक योगदान श्री देव सोमेश्वर व करंजेश्वरी देवीच्या पवित्र धामाच्या विकासासाठी, भंडाऱ्यासाठी, उत्सवांसाठी तसेच सामाजिक कार्यांसाठी वापरले जाईल.

Flower Right

Trust’s chairman Quote

अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले प्राचीन इतिहास असलेले श्री देव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान या देवस्थानाचे अध्यक्ष पद हे भागातील अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे पद !! या अध्यक्षपदी माझी निवड झाली ही माझे परम भाग्य समजतो. माझे पणजोबा स्वर्गीय धोंडो हरी तांबट हे करंजेश्वरी देवस्थान या संस्थेचे प्रथम पाच पंचांपैकी प्रमुख सरपंच होते तर चुलत आजोबा स्वर्गीय शांताराम बापू तांबट हे प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. आजोबा कमळाकर तांबट यांनी देवस्थानाचे कामात सर्वतोपरी काम करीत होते. वडील स्वर्गीय अशोक कमळाकर चिपळूणकर हे उपाध्यक्ष होते. माझं संस्थेतील योगदान व पद सांभाळण्याची समज याचे खेरीज काम करण्याची पूर्वजांचे व त्वष्ठाकांसार समाजाचे पुण्याईचे बळावर व गोवळकोट- पेठमाप- मजरेकाशी सर्व ग्रामस्थांच्या पसंतीने मिळालेले या अध्यक्षपदाचे बहुमानाला साजेसे काम करण्याचा मानस आहे.

ॲड. श्री. प्रसाद चिपळूणकर
Chairman

Upcoming Festivals

करंजेश्वरी देवीचा उत्सव हा चिपळूण परिसरात अत्यंत भक्तीभावाने साजरा केला जातो. या उत्सवात देवीची विशेष पूजा-अर्चा, अभिषेक, आरती तसेच सामूहिक धार्मिक कार्यक्रम होतात.

अर्चामहोत्सव (श्री देवी करंजेश्वरी जन्मोत्सव)
अर्चामहोत्सव (श्री देवी करंजेश्वरी जन्मोत्सव)
9 February, 2026

अर्चामहोत्सव (श्री देवी करंजेश्वरी जन्मोत्सव) हा माघ कृष्ण नवमी/दास नवमी या दिवशी, श्री देवी करंजेश्वरीच्या प्रगट दिनाच्या स्मरणार्थ म्हणून साजरा केला जातो....

शिमगा महोत्सव
शिमगा महोत्सव
28 February, 2026

फाल्गुन शु. त्रयोदशीला श्री देवीची पालखी श्री देव सोमेश्वराच्या पालखीसह गोवळकोटहून पेठमाप येथे येते व फाल्गुन पौर्णिमेला ला पालखी पेठमापहून गोवळकोटला परत...

चैतावली (श्री देवी रेडजाई मंदिर)
चैतावली (श्री देवी रेडजाई मंदिर)
2 April, 2026

चैत्र पौर्णिमेला मंदिरात साजरा होणारा चैतावली उत्सव हा देवीच्या भक्तांसाठी विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक दिवस मानला जातो. या दिवशी देवीची मंगलस्नान, अभिषेक,...